छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : राज्य शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि. १५) पोलिस दलात मोठे फेरबदल करत छत्रपती संभाजीनगरातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये शहराचे पोलिस उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत स्वामी यांची ग्रामीणचे नवे अपर पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी नवी मुंबईवरून आलेले प्रशांत मोहिते (आयपीएस) शहराचे नवे पोलिस उपायुक्त म्हणून धुरा सांभाळतील. गृह विभागाच्या या धडक निर्णयामुळे शहर व ग्रामीण पोलिस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल पाहायला मिळत आहेत.
ग्रामीणच्या अपर पोलिस
प्रशांत स्वामी
प्रशांत मोहिते
अधीक्षक (आयपीएस) यांची नागपूर शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. लोहमार्ग पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांना आता हिंगोली येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) समादेशक पदावर पाठवण्यात आले आहे. तर संभाजीनगर येथील एसआरपीएफचे समादेशक विक्रम साळी हे आता जालन्याचे नवे अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. अन्नपूर्णा सिंह
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions